in

प्रताप सरनाईक सांगतात, ‘ती’ अफवाच!

आरोप – प्रत्यारोप आणि दावे – प्रतिदाव्यांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सोशल मीडियावर एक खळबळजनक बातमी व्हायरल होत आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्याबद्दलची ही बातमी आहे. पण खुद्द सरनाईक यांनीच ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईत आणखी एक मृतदेह सापडला असून तो प्रताप सरनाईक यांचा असल्याचे सांगितले जाते. ते गेल्या ३-४ दिवसांपासून बेपत्ता होते, असेही सांगितले जाते. अशी ही बातमी होती.

यासंदर्भात लोकशाही न्यूजने थेट प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. हा कोणाचा तरी खोडसाळपणा असून आपण भाजपा आयटी सेलविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे ते म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मेळघाटात महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांच्या जाचामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

भांडूपच्या मॉलमध्ये अग्नीतांडव; 61 जणांना वाचवण्यात यश तर दोन जणांचा होरपळून मृत्यू