लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. सध्या प्रार्थना आपल्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आहे. प्रार्थनाने गोल्डन रंगाच्या साडीत फोटोशूट करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. गोल्डन रंगाच्या साडीत प्रार्थना खूपच सुंदर दिसते आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनाचे हे फोटोशूट पाहून चाहते फिदा झाले आहेत. काही वेळातच हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.
त्याचबरोबर ती एका हिंदी बेवसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.
Comments
Loading…