in

सोयगाव पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा जाधव

औरंगाबादमधील सोयगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांचा बिनविरोध विजय झाला आहे . रुस्तुलबी पठाण यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नव्याने सभापती निवडीसाठी आज सोयगाव पंचायत समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. प्रारंभी भाजपच्या लता विकास राठोड यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी लता राठोड यांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या प्रतिभा महेंद्र जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडीकरिता आज दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. दरम्यान शिवसेनेच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती प्रतिभा जाधव तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सुरेखाताई प्रभाकर काळे यांचा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यामुळे सोयगाव तालुका पंचायत समितीवर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम राहिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नंदुरबार जिल्हा बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

एकीकडे शेतकऱ्यांचा भारत बंद, दुसरीकडे पंतप्रधान परदेशात, नाना पटोलेंची जोरदार टीका