in

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा प्रवीण दरेकरांची मागणी

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी योग्यच आहे असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडले आहे . महाविकास आघाडीतील एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणल्यानंतर 20 दिवसानंतर मंत्र्याचा राजीनामा घेतला. विरोधी पक्ष, जनता आणि मीडियाचा दबाव वाढला नसता तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे मंत्र्याचा राजीनामा घेतला. आता धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको. असे देखील ते यावेळी म्हणाले. यावेळी वीजवाढीच्या मुद्द्यावरही ते आक्रमक झालेले दिसले.

धनंजय मुंडे प्रकरण?
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारी रोजी तक्रार केली होती. या प्रकरणी 11 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या तक्रारीबाबत समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फेसबुकला दणका ; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार

वाढीव वीज बील प्रश्नावरुन भाजप नेत्यांचं आंदोलन