in

Abhijit Bichukale | राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अभिजीत बिचुकले पुण्यात विकतोय ‘कंदी पेढे’

कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ सध्या काय करतात हा प्रश्न अनेकांना पडला असेल. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली.

अभिनजीत बिचकुले यांनी नुकतंच पुण्यात स्वतःचा ‘सातारा कंदी पेढे’ विक्री व्यवसाय सुरू केलाय. त्यामुळे साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार हे नक्की. अभिजित बिचकुलेनं पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ आपलं कंदी पेढ्यांचं दुकान थाटलं आहे.

आजवर केलेल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे त्यानं अनेकांचं लक्ष्यही वेधून घेतलंय. अभिजित बिचुकले हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरणार’ , ‘सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार’ अशी अनेक वक्त्यव्य अभिजित बिचकुले यांनी केलेली पाहायला मिळतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Update| संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये लॉकडाऊन

ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचं निधन