in

साखर कारखान्यांबाबत वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही निष्पन्न झालेले नाही- अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आयकर विभागाच्या धाडीनंतर आक्रमक झाले आहे. अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या साखर कारखान्यांवर इन्कम टॅक्स अधिकारी छापे मारले. (Income tax officer raid) जवळपास पाच ते सात दिवस चौकशी सुरु होती. याबाबत आपण कारखाने कितीला घेतले, कोणते विकले याची यादी पत्रकार परिषदेत घेऊन यावेळी साखर कारखान्याबाबत वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही निष्पन्न झालेले नाही अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली. साखर कारखान्यांच्या व्यवहारासंदर्भातल्या तपशीलाच अजित पवार यांनी वाचून दाखवला.

केंद्र सरकारला जे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी काम करावे. राज्यांचेही काही अधिकार आहेत, त्यांना तसे काम करु द्यावे. त्याचवेळी राज्यांनीही कोणाबद्दल कोणताही आकस न ठेवता काम करावे आणि यंत्रणेचा गैरवापर करु नये, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या बहिणींच्या संबंधित कारखान्यांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. त्यावेळी अजित पवार यांनी पाहुणे आले आहेत, ते जाऊ देत. नंतर मी बोलेन असे सूचीत केले होते. आता अजित पवार यांनी आपण पत्रकार परिषद घेऊन कारखाने कोणी कितीला दिलेत, कोणते विकले याची यादी देणार आहे. आपण कधी बेईमानी केलेली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कारखान्यांबद्दल उघड करणार माहिती; आयकरच्या छाप्यानंतर अजित पवार आक्रमक

ठाण्यात फेरीवाल्यांची मुजोरी कायम; कर्मचाऱ्याचा गळा कापण्यासाठी फेरीवाला गेला अंगावर धावून