in ,

”पंतप्रधानांना हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही”

देशभरात आज तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आज लस टोचून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे लसीकरण दिवसभर विविध मुद्यांवरून चर्चेत राहिले. मोदींच्या या लसीकरणावरचं आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील फोटो पोस्ट करून माहिती दिली. या फोटोमध्ये मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव पी. निवेदा असुन, त्या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच, पी. निवेदा यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या परिचारिकेचं नाव रोसामा अनिल असुन त्या केरळच्या असल्याची माहिती समोर आली.

दरम्यान मोदींनी लस घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर ट्विट करून हल्लाबोल केला. सतत हिंदुत्वाचा डंका वाजवणाऱ्या मोदींनाच हिंदू परिचारिकांवर विश्वास नसल्याचा त्यांनी सवाल उपस्थित केला. तसेच हिंदू परिचारिकांवर विश्वास नसल्यानेच त्यांनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली, काय वागणं आहे असेही ते म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, दररोज हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात पण हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही, म्हणून ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली, काय वागणं आहे.” असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिलासादायक; नवीन कोरोना रुग्णसंख्येत 2 हजाराने घट

शिक्षण संस्थांना कोर्टाचा दणका; अतिरिक्त शुल्क घेण्यास मज्जाव