in

पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार; मोदी काय बोलणार याकडे लक्ष?

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी देशाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला. ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीची रहिवासी आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली.

सकाळी सात वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करतील,” असं म्हटलं आहे. मोदी नक्की कोणत्या विषयावर बोलणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी कालच देशामध्ये १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याने मोदी या लसीकरण मोहिमेसंदर्भातच भारतीयांना माहिती देतील आणि लसीकरण मोहीम या पुढे कशी राबवली जाईल याबद्दल भाष्य करतील असं म्हटलं जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज राज्यात 1,573 नव्या कोरोनाबाधितांची वाढ; 39 मृतांची नोंद

आजपासून राज्यात चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु