in

वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी घोषणा केली आहे.

‘मी आज देशवासियांची क्षमा मागतो, स्वच्छ मनानं सांगतो की आमच्याच तपस्येत काही कमी राहिली. आम्ही आमचं म्हणणं काही शेतकरी बंधुंना समजावून सांगू शकलो नाही. आज गुरूनानकजींचं प्रकाशपर्व आहे. आज मी या देशाला हे सांगण्यासाठी आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तिन्ही कृषी कायदे संवैधानिक प्रक्रियेनुसार संपुष्टात आणणार आणू’, असं यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

‘आमच्या सरकारनं हे कायदे देशाच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतीच्या हितासाठी, शेतकऱ्यांप्रती पूर्ण निष्ठेनं आणले होते. मात्र, शेतकर्‍यांच्या हिताची ही गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवून शकलो नाही, आमच्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. कृषी अर्थतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना कृषीविषयक कायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केले. आम्हीही शेतकऱ्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला. प्रत्येक माध्यमातून संवाद सुरू होता. शेतकर्‍यांचा ज्या तरतुदींवर आक्षेप होता त्यांनाही बदलण्याची भूमिका सरकारनं घेतली होती. दोन वर्ष हे कायदा स्थगित करण्यासाठीही सरकारची तयारी होती. मात्र, हे होऊ शकलं नाही, याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.

सरकारनं जे केलं ते शेतकऱ्यांसाठी केलं. तुम्हा सर्वांसाठी मेहनत घेण्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. भविष्यात तुमची स्वप्न साकार करण्यासाठी मी आणखी मेहनत करेन, असंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“समीर दाऊद वानखेडेचं आणखी एक फर्जिवडा केंद्र”, नवाब मलिकांकडून आणखी एक ट्विट

Kisan Andolan | संसदेत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत घरी जाणार नाही- राकेश टिकैत