पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान होणार आहे. IHS Makit चे उपाध्यक्ष आणि कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॅनिअल येर्गिन यांनी सांगितलं की, “आम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भूमिकेविषयी पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाकडे पाहत आहोत. देश आणि जगाच्या आगामी काळातील ऊर्जेबाबत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत होत असलेल्या विकासात भारताच्या नेतृत्वाचा विस्तार करण्याच्या आपल्या बांधिलकीसाठी, आम्हाला त्यांना CERAWeek जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आनंद होत आहे,”
एका आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना CERAWeek जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व या पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक IHS Markit नं याबाबत माहिती दिली आहे. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत जॉन केरी, बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि ब्रेक थ्रू एनर्जीचे संस्थापक बिल गेट्स आणि सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासिर उपस्थित असतील.
Comments
Loading…