in ,

Priyanka Chaturvedi ; शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

नवी दिल्ली | शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना संसदेच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. या राजीनाम्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद टीव्हीवरील एका कार्यक्रमाच्या अँकर पदाचा राजीनामा दिला आहे. याचे कारणही त्यांनी सांगितले आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या राजीनाम्यासंबंधी राज्यसभेचे सभापती एम.व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. राजीनामा देताना खूप वाईट वाटतंय. पण संपूर्ण विचार करून संसद टीव्हीवरील शो ‘मेरी कहाणी’ च्या अँकर पदाचा राजीनामा देऊ इच्छिते, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रात म्हटले आहे.राज्यसभेतून आपल्याला निलंबित करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर संसद टीव्हीवरील ‘मेरी कहाणी’ या शोच्या अँकर पदवार कायम राहण्याची आपली तयारी नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत जो गदारोळ झाला त्यावरून 12 खासदारांना निलंबित करण्यात आले.

असभ्य वर्तनाबद्दल करण्यात आलेली ही निलंबनाची कारवाई संसदेच्या इतिहासात कधीच झालेली नाही. यामुळे आता आपल्याला त्याविरोधात बोलण्यासाठी आणि एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. तसेच आम्ही 12 खासदार निलंबनाची ही कारवाई कधीच विसरणार नाही, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

Omicron ; राज्याची चिंता वाढली, ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ