पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ‘न भुतो, न् भविष्यती’ अशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. इंधनाच्या दरात दररोज वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.
विरोधकांकडून या मुद्यावर सातत्यानं मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘संपूर्ण आठवड्यात ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, तो दिवस भाजपा सरकारनं ‘शुभ दिन’ म्हणून घोषित करावा’, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेसाठी ‘महंगे दिन’ ठरत आहेत, अशी खोचक टीकाही प्रियंका यांनी केली आहे.
देशभरातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०० रुपये लिटरच्या पुढे गेले आहेत. तर काही ठिकाणी पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. मागील आठवड्यात इंधनाच्या दरात सतत वाढ झाली. परभणीत पेट्रोल ९९.०१ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
Comments
Loading…