पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना वर्षा निवास्थानी बोलवलं होत. संजय राठोड यांना वर्षामध्ये दाखल होऊन सुमारे तासभर उलटून गेला होता. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याशी अवघी दोन मिनिटं जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला.
याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली… आणि बहुधा कानात सांगितलं असावं… मी तुला उध्वस्त होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे…’ असे म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Comments
Loading…