in

अमरावतीत कचरापोटीसमोर बसून होम-हवन, घाणीच्या साम्राज्याविरोधात निषेध

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने अमरावती येथील संत गाडगे बाबा यांच्या समाधीसमोर असलेल्या घाणीच्या साम्राज्याचे होम हवन करून अमरावती महानगर पलिकेचा प्रतिकात्मक निषेध केला. शहरात सर्वत्र घणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरत असल्याचा आरोप होतोय. दोन दिवसांअगोदर युवा स्वाभिमान पार्टीने महानगर पलिकेमधे ट्रक भर कचरा टाकून निषेध नोंदवला होता. परंतु महापलिकेत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचा आरोप करत जगाला स्वछतेचे संदेश देणारे संत गाडगे महाराज यांच्या समाधी समोर महानगर पालिकेने घाणीचे साम्राज्य निर्माण केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्याच्या निषेधार्थ युवा स्वाभिमान पार्टी तर्फे कचरा कंटेनरचे होम हवन करून पालिकेचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation | “आरक्षणाचा अधिकार केंद्राकडेच, 102 व्या घटनादुरुस्तीनंतर बदल”

वसई-विरारच्या हॉटेल व्यवसायिकांचा मूक मोर्चा