in ,

दोन आठवड्यात द्या कोरोना लसींचा हिशोब

केंद्र सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाने कोरोना लस खरेदीबाबतची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले. आजवर केंद्र सरकारने खरेदी केलेल्या कोरोना विरोधी लसींची सर्व माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणाच्या सूचना दिल्या. यासाठी केंद्राला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंत किती नागरिकांना कोरोना विरोधी लस देण्यात आली आहे आणि उर्वरित जनतेचे लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे. याशिवाय देशात म्यूकरमायकोसिसच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधांच्या उपलब्धतेसाठी सरकारने नेमकी कोणती तयारी केली आहे? याचीही माहिती सादर करण्यास न्यायालयाने यावेळी सांगितले.

आतापर्यंत किती नागरिकांचे लसीकरण झाले तसेच सरकारने केव्हा आणि किती लस खरेदी केल्या याची लेखी माहिती न्यायालयाने मागितली आहे. ही संपूर्ण माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात सादर करावी असे न्यायालयाने सांगितले.

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश एल. एन. राव आणि एस. रवींद्र भट्ट यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यानुसार केंद्र सरकारने आजवर खरेदी केलेल्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुतनिक-व्ही लशींच्या खरेदीसाठी नेमक्या केव्हा ऑर्डर देण्यात आल्या? एकूण किती लस खरेदी करण्यात आल्या आणि त्यांचे वितरण कशापद्धतीने करण्यात आले? याची स्पष्ट माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”मातोश्रीचे दरवाजे बंद केले, आम्ही जाणं नाही”,फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

राज्यांना लस देनं जमेना, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात लसीकरण कसे होणार ? ममतांचा मोदी सरकारला टोला