in ,

PSU Bank Privatisation | सरकारी बँकांचे खासगीकरण – पंतप्रधान

केंद्र सरकारच्या जनधन किंवा पीएम किसान योजना तसेच इतर योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकांचे आता खासगीकरण होणार असल्याचे संकेत आहेत. सर्वच क्षेत्रात सरकारनं असण्याची गरज नाही असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं असल्याने बँकांच्या खासगीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.

केंद्रीय अर्थ खात्यांतर्गत येणाऱ्या गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (दिपम) विभागामार्फत एका दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या चर्चासत्राला पंतप्रधान संबोधित करत होते. सरकारच्या १.७५ लाख कोटी रुपयांच्या निगुंतवणुकी प्रक्रिया पार पाडण्याचे काम या विभागाकडे आहे. मोदी म्हणाले की, व्यवसाय करणे हे सरकारचे प्रमुख कार्य नव्हे. तर व्यवसायाला सहकार्य करणे यावर सरकारने भर देण्याची मुख्य जबाबदारी आहे. सरकारने स्वत व्यवसाय करणे हा प्राधान्यक्रम असूच शकत नाही.

केंद्र सरकार देशातील सर्व सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सर्व क्षेत्रात सरकारने असण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. सार्वजनिक उपक्रमांच्या अत्याधुनिकरणासाठी सरकारची धोरणे यापुढेही असतील, असेही नमूद केले.

आजारी सरकारी उपक्रमांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत असून अशा आस्थापनांमध्ये देशातील करदात्यांचा पैसा अडकून पडला असल्याचे समर्थनही पंतप्रधानांनी केले. सरकारने अशा १०० हून अधिक आस्थापनांचे परिक्षण केले असून त्यामाध्यमातून २.५० लाख कोटी रुपये संकलित होऊ शकतात, असेही मोदी म्हणाले.

देशातील दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेत सादर करताना दिले होते. आयडीबीआय बँके व्यतिरिक्त या दोन बँका असतील. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील एका सर्वसाधारण विमा कं पनीचेही खासगीकरण करण्यात येणार असल्याही स्पष्ट करण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोरोना चाचण्या वाढवा, बाधितांचा संपर्क शोधा’

पालघर साधू हत्याकांड : नवे आरोपपत्र सादर करण्याचे आदेश