in

पबजीचा न्यू स्टेट हा नवीन गेम ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच

पबजीचा न्यू स्टेट हा नवीन गेम 11 नोव्हेंबर रोजी लाँच होणार असल्याची घोषणा क्राफ्टनने शुक्रवारी प्रदर्शन कार्यक्रमादरम्यान केली.नवीन मोबाईल गेम 200 हून अधिक देशांमध्ये Android आणि iOS वर रिलीज केला जाणार असून भारतासह 28 देशांत या गेमची तांत्रिक चाचणी ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

पबजी न्यू स्टेटची घोषणा फेब्रुवारीमध्ये झाली होती. तेव्हापासून Android आणि iOS वर 50 दशलक्षाहून अधिक पूर्व-नोंदणी झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. गेमच्या घोषणेनंतर जागतिक पातळीवर खेळाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु भारतात नोंदणी प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू झाली.पबजी-न्यू स्टेट जागतिक स्तरावर 17 भिन्न भाषांमध्ये विनामूल्य-टू-प्ले मोबाईल गेम म्हणून पदार्पण करेल, असे क्राफ्टनने YouTube वर प्रक्षेपित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. पबजी-न्यू स्टेट मोबाईल डिव्हाईसवर नेक्स्ट जनरेशन बॅटल रॉयल अनुभव आणेल ज्यामध्ये सर्व-नवीन तंत्रज्ञान आणि गनप्ले सिस्टीम समाविष्ट असणार आहे.

दरम्यान, या गेममध्ये प्रगत ग्राफिक्सदेखील असतील. पबजी बॅटलग्राउंड्स प्रमाणे, पबजी न्यू स्टेटसुद्धा पबजी स्टुडिओद्वारे विकसित केला जाईल. त्यात नवीन मॅप्स आणि सुधारित गेमप्लेचा समावेश असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक, दोघांना अटक करत पोलिस कोठडी

वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अहानचे बॉलिवूडमध्ये पदार्पण