in

Pune Ambil Odha | वेळोवेळी नोटिसा देऊन आम्हीच केली कारवाई – पुणे महापालिका

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात नागरिकांनी प्रचंड विरोध करुन, वारंवार हायकोर्टाच्या आदेशाची आठवण करुन देऊनही कारवाई सुरुच आहे. आंबिल ओढा परिसरात केलेली कारवाई ही सर्व नियम पाळून केलेली असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात नागरिकांना अनेकदा वैयक्तिक आणि वर्तमानपत्रांमधूनही नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचं पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी सांगितलं.

यासंदर्भात पालिकेच्या आयुक्तांसोबतही तीन ते चार वेळा बैठका झाल्या आहेत. त्यामुळे इथल्या सर्व नागरिकांना हे माहित आहे की आपलं पुनर्वसन जवळचं २०० मीटरवर असलेल्या राजेंद्रनगरमध्ये होणार आहे. सर्वांना तिकडे सुसज्ज फ्लॅट्स पालिकेने दिलेले आहेत. नाल्याला पूर येऊन काही होऊ नये यासाठी सध्या हे काम करणं आवश्यक आहे. आपल्याला महापालिकेची कोणतीही नोटीस मिळालेली नसून केवळ बिल्डरने आपल्याला नोटीस पाठवल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या नोटिसीची प्रतही नागरिकांनी दाखवली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मेंडकी येथे सापडले नवजात बालीकेचे अर्भक,कचऱ्यात आढळले अर्भक

स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार