पुण्यातील खराडी भागामध्ये पीएमपीची बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. खराडी बायपास रोड जवळ ही घटना घडली आहे. आग लागण्यापूर्वी या बसचा अपघात झाला असून या अपघातात बस खाली आलेल्या दुचाकी चालक तरुण यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे.
नगर रस्त्यावरील खराडी दर्गा येथील बालाजी हॉस्पिटल समोर आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास पी एम पी एम एल बस आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेमुळे झालेल्या घर्षणातून पी एम पी एम एल बसने पेट घेतला. PMPMLच्या बस सीएनजी वर चालणाऱ्या आहेत. बसमधील प्रवासी वेळ उतरल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही, मात्र बस खाली अडकल्याने दुचाकीस्वाराचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अजिंक्य येवले असे या तरुणाचे नाव असून तर 26 वर्षांचा होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Comments
Loading…