in

Pune Fire : पुण्यातील फॅशन स्ट्रीटला आग; 800 दुकानं जळून खाक!

पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामं असल्याने ती आग पसरली. आग विझवण्यासाठी १६ अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या आगीमुळे आसपासच्या अनेक भागांमध्ये वीज गेल्याचीही माहिती मिळत आहे.

पुण्यातल्या एमजी रोडवर असणाऱ्या फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये ही आग लागली आहे. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्यामुळे या भागामध्ये जाण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोठी कसरत करावी लागली. हे अडथळे पार करून काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बॉलिवूड अभिनेते परेश रावल निघाले पॉझिटिव्ह

Bhandup Hospital Fire | चूक रुग्णालय प्रशासनाचीच; हेमंत नगराळे