in

Ajit Pawar | हॉटेल मालकांना दिलासा, नाट्यगृहसुद्धा उघडणार

सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, तसेच महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरु करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली. अजित पवारांकडून पुण्याला मोकळं करण्याचा प्लॅन जाहीर केला. सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. सोमवारपासून महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरु करणार आहोत. तसंच सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित ट्रेनिंग सेंटर सुरु करणार आहे.

लसीकरण वाढवण्याच्या सूचना

राज्यात पुणे जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. झोपडपट्टी परिसरात लसीकरण वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्यात कोरोना दर 2.5 टक्के आहेत. तर कोरोना बाधितांचा दर 3 टक्के आहे. तर पुण्यात पहिल्या डोस घेणाऱ्यांचं प्रमाण 103 टक्के आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण वाढवण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले.

कोणकोणते महत्वाचे निर्णय?

  • सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 पर्यंत सुरु राहणार
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन स्थळे सुरु करणार
  • महाविद्यालये लवकरच सुरु करण्याचा विचार
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी पर्यत्न
  • मिशन कवच अभियान उत्स्फुर्तपणे राबवणार
  • पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालये सोमवारपासून सुरु होणार, विद्यार्थ्याांचं लसीकरण बंधनकारक

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Air India: एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे

Aryan Khan Drug Case | आर्यन खानच्या अडचणीत वाढ, जामीन अर्ज फेटाळला