in

Sinhagad Express सोमवारपासून धावणार

पुणे : अमोल धर्माधिकारी | मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. गेल्या 19 महिन्यांपासून ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती.

पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. ०१००९) सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी (क्र. ०१०१०) सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी निघेल आणि रात्री 10 वाजता पुण्यात पोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आ. राजू नवघरेंचा घोड्यावर चढून छत्रपतींना पुष्पहार; संभाजी बिग्रेडकडून कृतीचा निषेध

पवार साहेब सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाही’;आता फडणवीसांचे प्रत्युत्तर