in

Pune | सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

अमोल धर्माधिकारी , प्रतिनिधी

पुण्यातील चतुःश्रृंगी भागातून सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. रविवारी दुपारच्या सुमारास निखिल त्याच्या बेडरुममध्ये एकटाच होता. बराच वेळ झाला तरी तो रूमच्या बाहेर न आल्याने त्याच्या भावाने दरवाजा वाजवला. यावेळी आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा तोडून रूममध्ये गेल्यावर, निखिल याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

काही दिवसांपूर्वीच बायकोला पाजले होते हार्पिक
काही दिवसापूर्वीच दिराने हार्पिक पाजल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात पतीसह तिघांविरोधात चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि सोनाली यांच एक वर्षापूर्वी लग्न झालं होतं. दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. सोनाली नऊ महिन्यांची गर्भवती असताना बाळंतपणासाठी कोणत्या रूग्णालयात नाव नोंद करायचे यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचदरम्यान सोनाली यांचा दीर विकास आणि लक्ष्मी या दोघांनी पकडून हार्पिक क्लिनर पाजले. यानंतर तिला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पती निखिल धोत्रे, विकास धोत्रे आणि लक्ष्मी धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाहा काय आहे निखिलने सुसाईड नोटमध्ये ?
निखिल याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये निखिल याने असे म्हटले आहे की, आपल्याला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे आपण कर्जबाजारी झालो असून माझ्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे त्यात म्हटले आहे. आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे’,असे लिहिले आहे. तर या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिखर सावरकर पुरस्कारांची घोषणा, सोनम वांग्याल यांना जीवनगौरव

Ind Vs Eng | इंग्लंडचा स्टार गोलंदाज तिसऱ्या कसोटीला मुकणार