in

Ease of Living Index : केंद्राच्या यादीत मुंबईच्या तुलनेत पुणे टॉप

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नुकतीच राहण्यायोग्य असणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश झाला आहे. यामध्ये १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरांमध्ये पुण्यानं देशात दुसरा क्रमांक पटकावलाय. बंगळुरू शहराने पहिल्या स्थानावर स्थान मिळवले आहे, तर सहाव्या स्थानावर नवी मुंबई तर दहाव्या स्थानावर ग्रेटर मुंबई आहे. देशाची राजधानी दिल्लीचा १३ वा नंबर आलाय. राहण्यासाठी उत्तम असलेल्या शहरांच्या सर्वेक्षणात एकूण १११ शहरांचा समावेश होता. शहरातील विकास, वातावरण, सुविधा अशा गोष्टींचा या सर्वेक्षणात विचार करण्यात आलेला.

१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं:

 • बंगळुरू
 • पुणे
 • अहमदाबाद
 • चेन्नई
 • सूरत
 • नवी मुंबई
 • कोईम्बतूर
 • वडोदरा
 • इंदूर
 • ग्रेटर मुंबई

१० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं

 • शिमला
 • भुवनेश्वर
 • सिल्वासा
 • काकिनाडा
 • सेलम
 • वेल्लोर
 • गांधीनगर
 • गुरूग्राम
 • दावनगेरे
 • तिरूचिरापल्ली

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या सावटामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया तूर्तास ऑनलाइन, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Rekha Jare case; मुख्य आरोपी बाळ बोठेला कोर्टाचा दणका