in

पुणे विद्यापीठाची परीक्षा ऑनलाइनच

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंतिम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा गतवर्षीप्रमाणे ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने न होता . 50 गुण एमक्‍युसीद्वारे, तर 20 गुणांचा प्रश्‍न वर्णनात्मक असे 70 गुणांचा राहणार असून प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा 50 गुणांची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती.

त्यात अनेक विद्यार्थ्यांनी सामूहिक पद्धतीने परीक्षा दिली. तसेच, ऑनलाइनचा निकालही वाढला आहे. त्याचा विचार करून योग्य पद्धतीने आणि बारकाईने प्रॉक्‍टर्ड पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची परीक्षा 30 मार्चपासून घेतली जाईल. जवळपास 50 दिवसांत या परीक्षा होतील. दोन टप्प्यात परीक्षा घेतला जाणार असून, प्रश्‍नपत्रिकेसाठी प्रश्‍नसंच करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.


परीक्षा मंडळाची बैठक मंगळवारी झाली. यात सुमारे 6 लाख 50 हजार विद्यार्थ्यांची आणि सुमारे 7 हजार 500 विषयांची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, यावर चर्चा झाली. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी सांशक आहे. अशा परिस्थितीत ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली. ही परीक्षा ऑनलाइन आहे व मोबाइल, लॅपटॉप अथवा संगणकद्वारे घेण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कामत कुटुंब सुखावले; अखेर तीराच्या औषधावरील करमाफ

लोकसभेत नरेंद्र मोदींपाठोपाठ राहुल गांधींचे आज भाषण