in

“म्हणून ती चांगली आई होऊ शकत नाही, असा निकष लावू नये”

एखादी महिला विवाहबाह्य संबंधात असेल तर ती चांगली आई होऊ शकत नाही, असा निकष लावू नये, असे पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एका याचिकावर सुनावणीत म्हटले.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात साडे चार वर्षांच्या मुलीच्या ताब्यासाठी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी झाली. त्यामध्ये पतीने पत्नी विवाहबाह्य संबंधात असल्याने आपल्या मुलीचा ताबा आईकडे देण्यात येऊ नये, असा दावा केला होता. यावर अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई होऊ शकत नाही, असा होत नाही, अशी महत्त्वाची टिपण्णी पंचाब आणि हरियाणा उच्च न्यायालायने केली.

‘द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशीप अॅक्ट १९५६’च्या कलम ६ नुसार, पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी त्यांच्या आईलाच ‘नॅच्युरल गार्डीयन’ अर्थात ‘नैसर्गिक पालक’ मानले गेले, असेही न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या देखभालीसाठी त्यांची नैसर्गिक संरक्षक अर्थात आई सर्वात जास्त गरजेची ठरते. अशावेळी आईला पाल्याचा ताबा देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

French Open: नाओमी ओसाकाची स्पर्धेतून माघार

पाहा खणाच्या ड्रेसमध्ये सायलीची मनमोहक अदा