in

‘हलकी हलकी’ मधून अमृता खानविलकर-पुष्कर जोगच्या केमिस्ट्रीची झलक

पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर या फ्रेश जोडीचा ‘वेल डन बेबी’ हा सिनेमा आता लवकरच अॅमेझॉन प्राईम व्हडिओवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर अतिशय हिट ठरला आणि त्याला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसला. त्यानंतर सिनेमातील पहिलं-वहिलं गाणं रिलीज झालं त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमातील अजून एक रोमँण्टिक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘हल्की हल्की’ असे शीर्षक असलेले हे नवे गाणे आणि याचे सुखद संगीत सिनेमाच्या कथेला अगदी पुरक ठरतं हे नक्की. याच्या लक्षवेधक व्हिडिओतील चमकदार सिनेमॅटोग्राफीसह या गाण्याचे बोल श्रोत्यांच्या हृदयाची अचूक तार छेडतात. ‘हल्की हल्की’ हा एक असा ट्रॅक आहे ज्याला प्रत्येक स्तरावरील श्रोते आपल्याशी जोडून घेऊ शकतील.

रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणं रोहन प्रधान यांनी गायले असून वलय मुळगुंड यांनी लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या सिनेमाचं पहिले गाणे ‘आई-बाबा’ला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. कानसेनांचे पाय याच्या संगीतावर उत्साहाने थिरकायला लागले असून त्यांनी ते गाणे गुणगुणायला देखील सुरुवात केली आहे.

‘वेल डन बेबी’ची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना अचानकपणे एका वळणावर आणून उभे केले आहे जिथून पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित, या सिनेमात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग निर्मित आणि व्हिडीओ पॅलेसद्वारे सादर करण्यात येत असलेला हा सिनेमा भारतातील प्राईम सबक्राबर्स 9 एप्रिल 2021 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने केली राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा…

Maharashtra Lockdown : राज्यभरात व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्यास विरोध, संघटना एकवटल्या!