in

‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानसुद्धा गायब’

लस आणि ऑक्सिजन सोबत पंतप्रधान मोदी सुद्धा देशातून गायब आहेत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो”, असं राहुल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्यासह अन्य पक्षांनी देखील सेंट्रल विस्टा प्रकल्पावर खर्च करण्यात येणारा पैसा हा आरोग्य व्यवस्थेसाठी वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच कोरोनावरील औषधांवर जीएसटी कर न लावण्याची देखील मागणी विरोधकांतर्फे करण्यात आली होती. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी कोरोना औषधे, लसी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणांचा देशांतर्गत पुरवठा तसेच व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील असं सांगितले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरोग्य सेतू, झोमॅटो, ओला आमच्यापेक्षा जास्त डेटा गोळा करतात; WhatsAppचा हायकोर्टात दावा

अशी साजरी होते ‘रमजान ईद’