in

‘राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण’

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस हेरगिरी आणि कृषी कायद्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्यसभेत मोठा गदारोळ झाल्यामुळे मार्शल्स बोलवावे लागले. याचा निषेध म्हणून विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, हा मोर्चा झाल्यानंतर राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल राहुल यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांना मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप राहुल यांनी केला.

काय म्हणाले राहुल गांधी?

”आम्ही पेगॅससचा मुद्दा, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती. आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे यावं लागले कारण आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे, ”असे राहुल गांधी म्हणाले. काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मलायकाच्या आयुष्यात लवकरच होणार न्यू मेंबरची एन्ट्री!

गोंदिया डिस्ट्रिक्ट कोर्टात नोकरीची संधी!