in

राहुल गांधींनी बदलेले ‘ट्विटर धोरण’, अनेकांना केले अनफॉलो

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय आहेत. त्यांनी अनेक नेत्यांना आणि पत्रकारांना ट्विटरवर अनफॉलो केलं आहे. यात त्यांच्या पक्षाचे अनेक नेते, पत्रकार आणि काही जवळच्या लोकांचा समावेश आहे. एढेच नाही, तर कार्यालयात काम करणारे काही लोक आणि दिल्लीत काम करणाऱ्या काही वरिष्ठ पत्रकारांचाही यात समावेश आहे. राहुल गांधींच्या या अ‍ॅक्शनची सोशल मिडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राहुल यांच्या या अ‍ॅक्शनची चर्चा तीव्र झाल्यानंतर, काँग्रेस पक्षातील सूत्रांनी माहिती दिली, की ही एक एक्सरसाइज आहे. राहुल गांधींचे अकाउंट रिफ्रेश केले जात आहे. लवकरच काही लोकांची यादी तयार होईल. ज्यांना राहुल गांधी ट्विटरवर फॉलो करतील. यात आता अनफॉलो केलेल्या लोकांचाही समावेश असू शकेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MP Sunny Deol Missing पोस्टर्स व्हायरल; भाजप खासदार सनी देओलला शोधणाऱ्यास कॉंग्रेस देणार बक्षीस

Mumbai Vaccination | मुंबईत उद्या लसीकरण बंद