in ,

राहुल गांधी ‘ड्रग अ‍ॅडिक्ट’ आणि ‘ड्रग पेडलर’; कर्नाटकातील भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

कर्नाटकातील एका भाजप नेत्यानं काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध एक वादग्रस्त टिप्पणी केलीय. त्यामुळे, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कतील यांनी राहुल गांधी यांना ‘ड्रगअ‍ॅडिक्ट’ आणि ‘ड्रग पेडलर’ म्हटलंय.

‘राहुल गांधी कोण आहेत? राहुल गांधी ड्रग पेडलर आणि ड्रग अ‍ॅडिक्ट आहेत. ते पक्ष चालवण्याच्या योग्यतेचे नाहीत… हे मी नाही तर मीडियामध्ये आलंय’, असं म्हणत मीडियाच्या माध्यमातून नलीन कुमार यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. नलीन कुमार यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेसनं हा मुद्दा उचलून धरल्या. कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भाजप नेत्याच्या या वक्तव्याची निंदा केलीय. तसंच नलीन कुमार यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. आपलं राजकारण हे सभ्य आणि सन्मानजनक असायला हवं, असं मला वाटतं. आपल्या विरोधकांसाठीही, मला आशा आहे की, भाजपही माझ्या या मताशी सहमत असेल आणि प्रदेश अध्यक्ष नलीन राहुल गांधी यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानजनक टिप्पणीबद्दल माफी मागतील, असं ट्विट शिवकुमार यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन दरवाढीमुळे विद्यार्थी बैलगाडीवरून शाळेत

‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र