लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतकरी आंदोलनासंदर्भात टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिशा रवी या तरुणीला बंगळूरू येथून अटक केली. तिच्या अटकेवरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या ट्विटमध्ये “बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक! वो डरे हैं, देश नहीं! असे कॅप्शन देत काही घटनांच्या बातम्या ट्विट केल्या आहे. यात ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशाच्या बातमीसह पत्रकाराला देण्यात आलेली धमकी व ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याची बातमीही ट्विट केली आहे.
शेतकरी आंदोलनासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर बंदूक असणारे एका निशस्त्र मुलीला घाबरले आहेत, अशा शब्दात सडकून टीका केली आहे.
Comments
Loading…