लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारच्या ३ नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी मोदी सरकारला सातत्यानं धारेवर धरत आहेत.
‘पंतप्रधान मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या असे तीन पर्याय दिले आहेत’, अशी टीका राहुल यांनी राजस्थानातील अजमेरमध्ये बोलताना केली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभर महापंचायती भरत आहेत. राजस्थानातील रुपनगढ इथं महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केलं. ट्रॅक्टरवर बसून राहुल यांनी या रॅलीला सुरुवात केली.
कृषी कायदे लागू करणं हे बेरोजगारीचं कारण ठरेल. पंतप्रधान म्हणत आहेत की ते पर्याय देत आहेत. हो त्यांनी पर्याय दिला. भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या हे पर्यात त्यांनी दिले आहेत, असा मिश्किल टोमणा राहुल यांनी यावेळी लगावला.
Comments
Loading…