देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. याच संदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधीनी शेर लिहून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटकरत त्यांची भूमिका मांडली आहे. या ट्वीटला “वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं.” असे कॅप्शन देत एक नोट सुद्धा शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये “जून २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत असताना तेव्हा अंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या किंमती ९३ डॉलर प्रति बॅरल होते तेव्हा भारतात पेट्रोलची किंमत ७१ रूपये होती तर डीझेल ५७ रूपये होते. आणि ७ वर्षांनी अंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल्याच्या किंमती ६३ डॉलर प्रति बॅरल असूनही पेट्रोल, डीझेलच्या किंमती झपाट्याने वाढ होत आहे.” असे म्हटले आहे.
२०२१ मध्ये १९ वेळा ही दरवाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झालं आहे’, अशी आकडेवारी देखील त्यांनी सादर केली.
सध्या दिल्लीत पेट्रोलचे दर ९०.१९ रुपये तर डिझेलसाठी ८०.६० रुपये प्रतिलिटर झाले आहेत. मुंबईत पेट्रेल प्रतिलिटर ९६.६२ रुपये तर डिझेलचे दर ८७ रुपये ६७ पैशांपर्यंत वाढले आहेत. यासोबतच कोलकाता (पेट्रोल-९१.४१) आणि बंगळुरूमध्येही (९३.२१) पेट्रोल नव्वदीपार झाले आहे.
Comments
Loading…