in ,

Budget 2021 : राहुल गांधी यांचे राजकारण बालिशपणाचे, स्मृती इराणी यांचे टीकास्त्र

लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय सीमेवरील चीनच्या कुरापती सुरू आहेत. यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार तू तू – मैं मैं सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनचा संदर्भ देत अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. तर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या टीकाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. यंसीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सात हजार कोटी रुपयांची वाढ आहे. चीनने आपल्या देशाच्या भूभागावर कब्जा केला आहे. तर दुसरीकडे, पीआर फोटोसाठी पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. त्यांनी लष्करासाठीचे बजेट का वाढवले नाही?” असा खडा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.


स्मृती इराणी यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यांनी बहुधा हा अर्थसंकल्प हा व्यवस्थित ऐकला नसेल किंवा वाचला नसेल. चीनबद्दल वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबाचा इतिहास वाचावा. त्यांच्या कुटुंबीयांचे चीनशी कसे घनिष्ट संबंध होते, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्करासोबत दिवाळी साजरी करून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असा संदेश देतात. अशा वेळी जर राहुल गांधी अशी टीका करत असतील तर, ते बालिशपणाचे राजकारण आहे, असे म्हणावे लगेल, असा पलटवार स्मृती इराणी यांनी केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus : नवे 1 हजार 948 रुग्ण, 3 हजार 289 जणांनी केली मात

कृषी कायद्यांना विरोध : 6 फेब्रुवारीला देशभरात चक्काजाम करण्याची शेतकऱी संघटनेची घोषणा