in

फेसबुक, व्‍हॉटसअॅप स्‍टेटस ठेवण्‍यापेक्षा देशाचे स्‍टेटस कसे उंचावेल याकडे लक्ष द्या..

रायगडमधील पहिले आयएएस प्रतिक जुईकर यांचा तरूणाईला संदेश

भारत गोरेरावकर
“समाजाला तारून नेण्‍याचे सामर्थ्‍य तरूणाईत आहे. परंतु आजची तरूणाई भरकटेलली दिसते आहे. फेसबुक आणि व्‍हॉटसअप स्‍टेटस ठेवण्‍यापेक्षा आपल्‍या देशाचे स्‍टेटस कसे उंचावेल याकडे लक्ष द्या” असा संदेश नुकतेच आयएएस झालेले प्रतिक जुईकर यांनी तरूणाईला दिला आहे.

रायगड जिल्‍हयातील पहिले आयएएस होण्‍याचा मान जुईकर यांनी नुकताच मिळवलाय.  अलिबाग तालुक्‍यातील चौकीचा पाडा वालवडे या त्‍यांच्‍या मूळ गावातील ग्रामस्‍थांच्‍या वतीने आमदार जयंत पाटील यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला, या कार्यक्रमातले त्यांचे हे तरूणाईला प्रोत्साहित करणाच्या दृष्टीने केलेलं हे विधान नक्कीच विचारात घेण्यासारखे आहे. सत्‍कार समारंभात परीसरातील नागरीक, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. प्रतिक यांना घडवणारे त्यांचे आईवडील, आजी आजोबा यांनाही सन्मानित करण्यात आले. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अफगाणिस्तानातील मशिदीत भीषण स्फोट; 100 जणांचा मृत्यू

बॉलीवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर; ‘या’ निर्मात्याच्या घरी आणि कार्यालयावर छापे