in

Railway Megablock | उद्या ‘या’ वेळेत धावतील लोकल

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई उपनगरी लोकल मार्गावर उद्या रविवारी तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉककाळात काही लोकल फेऱ्या बंद राहणार असून उर्वरित लोकल फेऱ्या पर्यायी मार्गाने सुरू राहणार आहेत. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

मध्य रेल्वे

स्थानक – माटुंगा ते मुलुंड

मार्ग – अप आणि डाउन जलद

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

परिणाम – ब्लॉक काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत

परिणाम – सीएसएमटी/वडाळा रोडवरून पनवेल-वाशीसाठी सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या मार्गावरील अप-डाउन फेऱ्या बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष फेऱ्या चालविल्या जातील. मेल-एक्स्प्रेस गाड्या काहीशा विलंबाने धावणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकातील लोकल सुरू राहणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

National Women’s Day | पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा करणार?

Petrol Diesel Price | पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर