in

थरारक व्हिडीओ ,रेल्वे पोलिसांनी वाचवले प्रवाशाचे प्राण…

वर्ध्यात रेल्वे स्थानकावर चहा पिण्यासाठी धावत्या रेल्वेमधून खाली उतरत असणाऱ्या प्रवाशाचा थोडक्यात जीव वाचला आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’, असं नेहमी म्हटलं जातं आणि त्याची प्रचिती नुकतीच वर्धा रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाली. धावत्या रेल्वे उतरताना पाय घसरून एक पुरुष प्रवाशी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला होता. पण, वेळीच देवदुताप्रमाणे रेल्वे पोलीस मदतीला धावून आले आणि या पुरुष प्रवाशाचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वर्धा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. 2 वर ही घटना घडली होती. गौरव दुबे असं त्या प्रवाशाचे नाव असून तो अजनी-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये प्रवासात करीत होता. रेल्वे प्रवासात चहा पिण्यासाठी वर्धा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 2 वर चालत्या रेल्वेतुन गौरव दुबे हे उतरण्याचा प्रयत्न करीत असता त्यांचा तोल जाऊन तो खाली पडला. धावत्या रेल्वेमुळे त्यांना जोराचा धक्का बसला आणि त्या रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात अडकल्या गेल्या. मात्र, त्याचवेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस घनश्याम शिंदे यांनी धाव घेतली आणि त्यांना बाहेर खेचून काढले.

रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. धावत्या रेल्वेत चढ व उतरण्याचे धाडस करू नका, अशी वारंवार सूचना रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे. त्यातून प्रवाशी आपल्या जीवाची पर्वा न करता नको ते धाडस करता आणि जीवाला मुकतात. त्यामुळे असा कोणताही प्रसंग घडला तरी धावत्या रेल्वे चढू नका, असं आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आसाममध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापट

आता घरीच मिळणार लस