in

Rain Update | राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस

राज्यात मान्सूनचं आगमन होण्याआधी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या काही तासांमध्ये पुण्यासह सातारा, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, बीड, परभणी हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. आताही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा अनेक जिल्यांमध्ये ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी काल पाऊस ४ तासाहुन अधिक पाऊस झाला.

राज्यात महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती वर्तवण्यात येत आहे. यामुळे गरमी कमी होऊन नागरिकांना गारवा अनुभवता येणार आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुणे, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे ४ दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितल्या ‘या’ ४ युक्तीच्या गोष्टी