in

Rain Update | रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात पूरस्थिती; एक जण वाहून गेला

मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरू आहे. आजसाठी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारपासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं धुमाकुळ घातला आहे. मुसळधार पावसामुळं राजापुर शहरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आला आहे. तर, अमरावती, नांदेड जिल्ह्यातही पावसानं दाणादाण उडवली आहे.

  • वसई, नालासोपारा परिसरात पावसाचा जोर वाढला
  • राजापुरात पूरस्थिती; अनेक गावांचा संपर्क तुटला
  • राजापुरः पुराच्या पाण्यात कोंढेतड पुलाजवळून एक जण वाहून गेला
  • रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर भागात पूर परिस्थिती; जवाहर चौकात पाणी शिरले
  • मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात
  • मुरुड तालुक्यात गेल्या २४ तासांत ३४८ मिमी पाऊस; जोरदार पावसानं मुरुड-आगरदांडा रोड पाण्याखाली
  • रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रायगड-काशिदजवळच्या नदीवरील पूल वाहून गेला
  • परभणी शहरात रविवारी ढगफुटी सदृश्य पाऊस; जायकवाडीचा कालवा फुटल्यानं अनेक घरात पाणी
  • राजापूर येथे आलेल्या पूरात एक व्यक्ती वाहून गेल्याची प्राथमिक माहिती
  • रत्नागिरीः अर्जुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास मुंबई- गोवा महामार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद करण्याचा इशारा
  • राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस, शहरात पूर परिस्थिती
  • नांदेड जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस, अनेक भागांत तीन- चार फुट पाणी साचले
  • चंद्रभागा नदीला पूर; बाबळी ते बनोसा या गावांना जोडणाऱ्या पुलावर नदीचे पाणी

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs SL : भारत-श्रीलंका सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

वर्ध्यातील सेलू काटे परिसरात वन जमिनीवर अवैध उत्खनन