in

राज ठाकरेंनी माजी महापौरांना काढायला लावला मास्क

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना, राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क घातले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’ असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केले.

राज ठाकरे यांनी माजी महापौरांना मास्क काढण्याचा इशारा केल्यामुळे उपस्थितीत असलेल्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लगेच आपल्या चेहऱ्यावर लावलेले मास्क बाजूला केले आणि राज ठाकरे यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनीही मास्क लावलेले नव्हते.

त्यामुळे राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यातही विना मास्क एंट्रीवर प्रशासन काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी समोर प्रचंड गर्दी असतानाही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क का लावला नाही, या पत्रकाराच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. ‘मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय’, असं म्हणत राज यांनी काढता पाय घेतला होता.

दरम्यान, काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही, पण बाकीच्यांना करोना झाला तर काय करायचे’, असा टोला विधान परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण : रिया चक्रवर्ती विरुद्ध NCB दाखल करणार पहिले आरोपपत्र