in

राज ठाकरेंसह आई आणि बहिणीला कोरोनाची लागण, डॉ. जलील पारकर म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासह बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत आहेत.

राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज यांच्यासोबतच त्यांची बहीण आणि आई यांनादेखील कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या राज यांच्यावर डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या बहिणीलाही कोरोनाची लागणी झाली आहे. दोघेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. आम्ही त्यांना मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. ते तीन तासांत घरी जातील. त्यांना घरीच क्वॉरन्टाईन केले जाईल. त्यांच्या आईदेखील रात्री रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनाही आम्ही अँटिबॉडी कॉकटेल दिले आहे. तीन तासानंतर राज यांना घरी सोडले जाईल,” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरकारने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी – प्रशांत दामले

चीन,रशिया कोरोना पुन्हा डोकवर काढतो