in

“मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकारचा नकार”

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मराठी स्वाक्षऱ्यांची मोहिम राबवण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, मनसेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. तसेच अनेक मराठी कलाकारांनीही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

पोलिसांनी परवानगी न दिल्याने राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. करोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात राज यांनी संताप व्यक्त केला.

दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज म्हणाले, “खरं तर त्यांच्या मनात आहे की, नाही. फक्त आपलं संभाजीनगरसारखं करायचंय. अशा प्रकारचे दिवस आल्यानंतरच सरकारला जाग का येते? त्यांना असं बोलावं का वाटतं. इतकी वर्ष यांच्या हातातच सरकार आहे. मग का होत नाहीत या गोष्टी. या मुद्द्यात राजकारण कसलं. इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर होईल,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सराईत गुन्हेगाराचे स्वागत करणे पडले महागात

कोरोनामुळे अंगारकी चतुर्थीला दगडूशेठ हलवाई मंदिर बंद!