in

‘सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा’; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्रांद्वारे मागणी

गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्राच्या अनेक भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत ४३६ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाकडे या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील या पूरस्थितीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिर्डी विमानतळाच्या सभोवताली शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबईत वयस्कर महिलेवर बिबट्याचा हल्ला; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!