in

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली आहे.शिंगणे यांनी गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. राजेंद्र शिंगणे यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.

राजेंद्र शिंगणे यांनी ट्विटमध्ये म्हटले, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.

राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी ते आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये राजेंद्र शिंगणे यांनी पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mapping Policy मध्ये केंद्र सरकारचा मोठा बदल

चिंताजनक; सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या साडे तीन हजार पार