in

‘मौन साधून शेतकऱ्यांविरोधात मोठं पाऊल उचलण्याची केंद्राची तयारी’

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी गंभीर आरोप केले आहेत. सरकार मौन साधून आहे याचा अर्थ ते शेतकरी आंदोलनाविरोधात मोठं पाऊल उचलण्याची तयारी करत आहेत, असा गंभीर आरोप टिकैत यांनी केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सरकार गप्प आहे. सरकार नक्कीच कशाचीतरी तयारी करत आहे. कृषी कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत दिल्लीतून मागे हटणार नाही, असे टिकैत म्हणाले. मागण्या मान्य झाल्या तर गावी परत जाऊ अन्यथा शेतकरी शेतीसोबत आंदोलनही करतील, असा इशाराही टिकैत यांनी दिला.

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, यातून काहीच निष्पन्न झालं नाही. शेतकऱ्यांनी सूचवलेले बदल आम्ही करू, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. मात्र, कायद्यात बदल नको तर कायदे रद्द करा, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

क्रिकेटर हरभजन सिंहच्या ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचे टीझर लाँच

Maharashtra budget session 2021 LIVE | मुंबईला 4 वर्ष उशिराने मेट्रो मिळणार – मेट्रोवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल