in

‘आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो’; राम कदमांचे ट्वीट

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या(Aryan Khan) जामिनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपचे आमदार राम कदम(Ram Kadam) यांनी यासंदर्भात ट्वीट करुन आर्यनच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे.

प्रार्थना आहे की आज #आर्यनखान ला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लड़ाई नाहीं अखंड मानव जातीची #ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती #महाराष्ट्रसरकार निदान ह्या खतरनाक ड्रग्स प्रकरणात.. असं राम कदम यांनी ट्वीट करुन म्हणाले आहे.

आर्यन खान प्रकरणाबाबत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर भाजप पेटून उठली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी प्रश्न विचारला की, ड्रग माफियांशी महाराष्ट्र सरकारचे काही संबंध आहेत का? शिवसेना नेते आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. भाजप कधीच आर्यन खान किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. आम्ही शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नाही. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, असं राम कदम म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माहाराजांच्या पुतळ्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी मध्ये चढाओढ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तराखंड दौऱ्यावर