in

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी १००० कोटींचा निधी जमा

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरू आहे. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते मान्यवरांपर्यंत सर्वच जण यात योगदान देत असून सोशल मीडियावर याबाबत पोस्टही केल्या जात आहेत. राजकीय नेतेही यात मागे नाहीत. या मोहिमेच्या माध्यमातून सध्या सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा झाला आहे, अशी माहिती ट्रस्टचे एक विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने या ट्रस्टचे काम चालते. १५ जानेवारीपासून या ट्रस्टने देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला. याद्वारे आत्तापर्यंतच केवळ दीड महिन्यातचं ट्रस्टकडे १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, “दक्षिण भारतातील जनतेनं या मोहिमेला देलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. निधी गोळा करायच्या कामासाठी मी मोठा प्रवास केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे. निधीमध्ये वाढ होणं ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही. तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचं या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.

सर्व मंदिरं संरक्षित करावी

राज्यातील सर्व मंदिरं ही संरक्षित करावी अशी मागणी पेजवर यांनी केली आहे. कारण यामुळे मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण करण्याचा कोणी विचार करणार नाही आणि त्यामुळे भविष्यात वाद होणार नाहीत, असं विश्वप्रसन्न महाराज यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आतापर्यंत राम मंदिरासाठी निधी दिला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार, गुरमीत चौधरी, क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचाही यात समावेश आहे. तसंच, या सेलिब्रिटींनी इतरांनीही निधीमध्ये योगदान देण्याचं आवाहन केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन दरात पुन्हा वाढ , जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

…जुमलाजीवी नहीं, पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर