in

अशी साजरी होते ‘रमजान ईद’

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. मात्र सध्या कोरोनाची महामारी आहे त्यामुळे यावेळी सुद्धा ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे ईद म्हणजे आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

ईस्लाम धर्माच्या हिजरीसननुसार नववा महिना ‘‘रमजान’’ आहे. या महिन्यात आपल्या दासांवर अल्लाहची खूप मोठी कृपादष्ष्टी असते. तसेच रमजान हा खूप भरभराटी व बरकतीचा महिना आहे. आम्ही या महिन्यात रोजे राखतो किंवा नमाज, कुराणपठणसारखी कामे करून उपासना करतो म्हणून हा महिना पवित्र मानला जातो असे नाही. तर खछया अर्थात या महिन्यात प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावर कुराण सारखे पवित्र व पाक ग्रंथ अवतरीत झाले. म्हणून या महिन्याची ख्याती व महिमा अपार वाढली आहे.

रमजान आगमनाच्या काही काळ आधीच प्रत्येक मुस्लीम मोहल्ल्यात याची चाहूल लागण्यास सुरूवात होते. याचे आगमन होताच हे मोहल्ले रोशनाईने न्हाऊन गेलेले असतात. जीकडे तीकडे सजावट, फुलांच्या माळा, तोरण, व मंडपांचे लखलखाट असते. याच्याशीच संबंधीत दुसरी बाब अशी की. खानावळे, लहान-मोठ्या हॉटेली. फळांच्या, कपड्यांच्या, व इतर सामुग्रींच्या दुकानांचेही साम्राज्य पसरलेले दिसते. प्रत्येक ठिकाणी श्ररमसाठ गर्दी आढळते. हे असे दष्श्य पाहून इतर समाजातील काही लोकांचे असे गैरसमज होते की, हे रमजान म्हणजे काय खाण्यापिण्या व मौजमजा करण्याचे निमीत्त आहे की काय? आणि हे सर्व पाहून कोणाच्याही मनात असे विचार येणे साहजीकच आहे. यासाठी सांगू ईच्छितो की, रमजानचे वैशिष्टये व यातील रोजाचे उद्देश हे याउलट आहे.

या रोजाद्वारे अल्लाह आपल्या दासांना या गोष्टीची जाणीव करून देतो की, तुमची तहान व भूक भागवीणारे तसेच माझ्याकडून प्राप्त होणारे अनमोल घटक पाणी, अन्नधान्य व्यतिरीक्त इतर जीवनावश्यक गरजांची कदर निर्माण व्हावी. काही तास खान पान शिवाय राहील्यास तुमची काय अवस्था होते यावरून माझ्याकडून प्राप्त सवलतींचे महत्व कळायला हवे. शिवाय आपल्या शेजारी पाजारी तसेच समाजात वावरणाछया गोरगरीबांची काय परिस्थिती असते याची जाणीव होणेही गरजेचे आहे. मात्र याउलट रमजान हे जणू खाण्यापिण्यासाठीच असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. याउलट अल्लाहचे आदेश काय? व हे कशासाठी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गोरगरीबांसाठी जकात (श्रीमंतांकडे असलेल्या मालमत्तेत गरीबांचा वाटा) ही सुध्दा याच महिन्यात देणे बंधनकारक आहे. ज्यामुळे त्यांची व त्यांच्या परिवाराचीही ईद चांगल्यारीत्या साजरी होऊ शकते. मात्र आजही काही श्रीमंत लोकं अशी आहेत जी आपल्या परिवारासाठी तर एकापेक्षा एक साधने खरेदी करू शकतात मात्र गरीबांसाठी त्यांच्याकडे काही शिल्लक नसते. उपरोक्त ह्या अवाजवी प्रथा आता संपुष्टात यायला हव्या व रमजानचे खरे उद्देश व महत्व आपण सर्वांना कळावे.

(आमीन) रमजान महिन्यात अल्लाहकडून आपल्याला खूप बक्षिसे प्राप्त होतात, ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे या पवित्र महिन्यात कुठल्याही उपासनेसाठी तसेच पुण््यकमवीण्यानिमीत्त केलेल्या कामांसाठी अल्लाहने इतर काळातील बक्षिसांपेक्षा सत्तर पटीने जास्त मोबदला देण्याचे जाहिर केले आहे, शिवाय शैतान हा या महिन्याच्या सुरूवातीलाच बंदीवासात जातो व महिना संपल्यावरच त्याची सुटका होते. म्हणजे इतर महिन्यांप्रमाणे संपुर्ण रमजान आपल्याला वाईटमार्गी लावून पापांच्या दुनियेत नेणे त्याला शक्य नसते. या महिन्यात आपल्या घरात, परिवारात अल्लाहची खूप-खूप कृपादृष्टी असते. संपुर्ण महिन्यात त्याची माया व बरकत लाभते.

आम्हाला आथिंकदृष्ट्या मदत होते. इतर कुठल्याही प्रकारचे नैराश्य, संकट सारख्या समस्यांपासूनही आपले संरक्षण होते. अल्लाहकडून अशा अनेक व बेसुमार मदती व कृपा आपल्याला या रमजान महिन्यात प्राप्त होऊ शकतात.

ईस्लाम धर्मात अल्लाहची इबादत (उपासना) करणे हे आपल्या जीवनाचे मूळ उद्देश आहे. त्याचे आदेश मानने व त्याच्या प्रति आपले जे काही कर्तव्य आहे ते कुठल्याही परिस्थितीत पुरे करणे. यात अल्लाहने त्याची उपासना म्हणून या काही बाबींना अनिवार्य केले आहे. जसे नमाज रोजा (उपवास), जकात (श्रीमंतांनी आपल्या कमाईत गोरगरीबांचाही वाटा ठेवणे) व हज (ज्यांची आथिंक परिििस्थती चांगली आहे त्यांना अनिवार्य आहे.) मात्र या सर्व अनिवार्य उपासनेत रमजानच्या दष्ष्टीने रोजा (उपवास) हा यातील महत्वाचा घटक मानला जातो. कारण एक असे की. हा फक्त रमजान महिन्यातच बंधनकारक आहे. दुसरे असे की इतर उपासनेच्या कृतीमुळे एक दष्श्य समोर उभा राहून हा भास होतो की. आपण अल्लाहची उपासना करीत आहो. जसे नमाजमध्ये आपण उठतो, बसतो, रूकुअ, सजदासारख्या क्रिया करतो.

जे लोकांसमोर जाहिर होतात. हजयात्रेला जातांना इतर लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडून क्षमायाचना करून लांबचा प्रवास करून जाणे हेही लोकांना कळते. जकात ही कमीतकमी दोन लोकांना (देणारा व घेणारा) तरी जाणीव करून देते. मात्र रोजा हा एकप्रकारे गुप्तपणे होणारी उपासना आहे. जी फक्त अल्लाह व आपल्या दरम्यान सामाईक असते. इतरांना याची कल्पनासुध्दा करता येत नाही. सहेरी (पहाटेचे जेवण) व इफ्तार (संध्याकाळी काही खाऊन रोजा सोडणे) यादरम्यान कोणासमोर काही खात पीत नाही. मात्र लपून छपून पाणी पीतो तर हे फक्त त्याला व अल्लाहलाच माहित असते. मात्र याउलट जो फक्त अल्लाहला राजी करण्यासाठी दिवसभर खरोखर उपवास करतो. लपून-छपूनही काही खात नाही. पाणी वाचून त्याला घशाला कोरड सुटते, तरी पाण्याचा एक थेंब आपल्या घशात उतरवीत नाही.

कडाक्याची भूक लागली असतांनाही कुठलाही पदार्थ चाखत नाही. फक्त याच भिती पोटी की, माझा पालनहार मला पाहत आहे. त्याला माहित आहे की, अल्लाह हा प्रत्येक गोष्टीचे व प्रत्येक परोक्षाचे ज्ञान बाळगतो. त्याच्यावाचून कुठलीही गोष्ट लपलेली नाही. अल्लाहचे भय त्याच्या मनात असल्याने तो असे कुठलेही कृत्य करीत नाही की, ज्यामुळे त्याचा रोजा (उपवास) मोडला जाणार. त्याला परलोकातील बक्षिसे व शिक्षेविषयी किती विश्वास आहे, हे यावरून सिध्द होते. अल्लाहवरील विश्वास व निष्ठा भक्कम व मजबूत होत जाते व आपण त्याचे भय बाळगून त्याच्या कायद्यांचे उल्लंघन न करता त्याचे आदेश मानतो, त्याच्या कर्तव्यांची पुर्तता करतो. त्याच्या कसोटीत पुर्ण उतरल्याचे आपणांस समाधान वाटते.

रोजा म्हणजे फक्त खाणे पीणे त्याग करणे हेच नाही, तर यासाठी शरीयतने अजूनही कायदे ठरवीलेले आहेत. जसे रोजा असतांना चोरी, चुगली चहाळी करू नका, खोटे बोलू नका, परस्तीर्वर वाईट नजर टाकू नये, रोजा असतांना दिवसा शरीर संबंध करू नका, (या बाबत काहींचे असे गैरसमज आहे की संपुर्ण रमजान महिना शरीर संबंध करू नये हे चुकीचे आहे.) अशा अनेक पापांपासून दूर राहणे म्हणजे खछया अर्थात रोजा होय. रोजा म्हणजे अल्लाहकडून आपल्या ईमानाची (अल्लाहवरील विश्वास) पारख व एक कसोटी आहे. यात आपण कसे व किती खरे उतरतो हे आपल्यालाच ठरवायचे आहे. याशिवाय हे एक प्रशिक्षणही आहे.

कारण हा संपुर्ण महिना शरीयतचा (ईस्लामी कायद्याचा) निरंतरपणे पालन करवीतो. पहाटे सहरीसाठी उठणे, ठरलेल्यावेळी खाणेपिणे बंद करणे, हे काम करू नये किंवा हे काम करावे, संध्याकाळी ठरलेल्यावेळी इफ्तार करा वगैरे ही एक शिस्तबध्द कवायतच असते. ज्यामुळे आपसल्याला इतर अकरा महिने अल्लाहच्या आदेशानूसार व मुहम्मद (स) यांच्या मार्गदर्शनावर जीवन जगणे सोपे जाते.तसं तर बारा महिने नमाज अदा करणे हे अनिवार्य आहे. मात्र रमजानमध्ये नमाज न अदा करणे म्हणजे आश्चर्यच आहे. कारण असेही दिसून येते की काही फक्त रोजा पकडतात मात्र नमाज अदाच करत नाहीत व काही रोजा राखूनही वेळप्रसंगी टाळाटाळ करतात. याबाबत शरीयतने असे म्हटले आहे की, नमाजशिवाय रोजा म्हणजे शिर नसलेले धड होय. यास अनुसरून मुहम्मद (स) यांनी या महिन्यात जादा नमाज अदा करता यावी म्हणून तरावीहची वीस रकात सुन्नत नमाज अधिक (इतर वेळी न होणारी) या पवीत्र महिन्यात सुरू केली. आजही ती अमलात आहे. हीच्या माध्यमाने संपुर्ण महिन्यात आपणांस अल्लाह समक्ष उभे राहूनी तंतोतंत कुराणचे शब्द ऐकावयास मिळतात. ज्यामुळे रमजानच्या प्रत्येक मुबारक रातीर्त होणाछया उपासनेत चांगलीच भर पडते.

आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत अल्लाह कृपेने पुन्हा आपणांस रमजानसारखा पवित्र व लाभदायक महिना प्राप्त झाला . हे आपले भाग्यच म्हणावे. कारण पुढचे रमजान आपल्याला प्राप्त होणार की नाही हे अल्लाहलाच माहिती. ईद उलल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसर्‍या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरवात करतात.

मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते. ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायदामध्ये करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनी ही या वर्षांतून एकदा येणार्‍या महान पर्व- ईदचा आनंद तुटता यावा.

निसार महंमद शेख शिरगाव

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानसुद्धा गायब’

परराज्यातून महाराष्ट्रात यायचं असेल तर ‘हे’ बंधनकारक