in

निरोपाच्या भाषणात आठवलेंची ‘ऑफर’ ऐकून राज्यसभेत हास्यकल्लोळ

अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान आज राज्यसभेत चार खासदारांना निरोप देण्यात आला. कार्यकाळ संपल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना सर्व सदस्यांनी निरोप दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभेत त्यामुळे आज भावूक वातावरण होतं. नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाल्यानंतर सर्वत्र शांतता होती.

मात्र, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सर्वांना खदखदून हासायला भाग पाडलं. शुभेच्छा देताना आठवलेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कविता करत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. केवळ शुभेच्छा देऊन न थांबता आठवले यांनी गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा राज्यसभेवर यावं अशी इच्छा बोलून दाखवली. काँग्रेस तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर आणणार नसेल तर आम्ही तयार आहोत अशी ऑफरही आठवलेंनी दिली.

गुलाम नबी आझाद, शमशेर सिंह मन्हास, मीर मोहम्मद फयाज, नाझीर अहमद या चार सदस्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज संसदेमध्ये खासदारांना निरोप देण्यात आला. यावेळी राज्यसभेमध्ये विरोधीपक्ष नेते असणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना शुभेच्छा देताना रामदास आठवले यांनी त्यांच्या कवी स्टाईलने शुभेच्छा दिल्या.

१५ फेब्रुवारी हा गुलाम नबी आझाद यांच्यासहीत इतर तीन खासदारांचा राज्यसभेचे सदस्य म्हणून शेवटचा दिवस असेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकरी आंदोलन हे तथाकथित – अतुल भातखळकर

CoronaVirus : देशातील नव्या रुग्ण संख्येत सातत्याने घट